नवी मुंबई | प्रतिनिधी
नवी मुंबईतील ऐरोली येथे कार्यरत असलेल्या Clinitech Laboratory Ltd (CTL Lab) या डायग्नोस्टिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात पदार्पण करत आपला SME IPO यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आरोग्य व वैद्यकीय तपासणी क्षेत्रातील या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.
CTL Lab चा IPO 25 जुलै ते 29 जुलै 2024 या कालावधीत खुला होता. हा IPO ₹96 प्रति शेअर या निश्चित दराने आणण्यात आला होता. एकूण ₹5.78 कोटींच्या या इश्यूमध्ये 6,02,400 इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले होते. किमान अर्जासाठी 1,200 शेअर्सचा लॉट ठेवण्यात आला होता.
विशेष म्हणजे या IPO ला सुमारे 39 पटांहून अधिक सबस्क्रिप्शन मिळाले, ज्यामुळे SME क्षेत्रातील हा IPO चर्चेत आला. गुंतवणूकदारांचा वाढता कल आरोग्य सेवा क्षेत्राकडे वळताना दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कंपनीचे शेअर्स 1 ऑगस्ट 2024 रोजी BSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध झाले. CTL Lab ही कंपनी डायग्नोस्टिक व मेडिकल टेस्टिंग सेवा पुरवते. रक्ततपासणी, बायोकेमिस्ट्री, इम्युनोलॉजी, हेमॅटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, हिस्टोपॅथोलॉजी यांसारख्या विविध चाचण्या कंपनीकडून केल्या जातात. कंपनीकडे NABL मान्यताप्राप्त लॅब असून नवी मुंबई आणि आसपासच्या भागात तिची उपस्थिती आहे.
IPO मधून उभारलेली रक्कम डायग्नोस्टिक सेवा विस्तार, आधुनिक उपकरणांची खरेदी तसेच कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रात वाढती मागणी, स्थानिक पातळीवरील विश्वास आणि IPO ला मिळालेला प्रतिसाद पाहता, CTL Lab चा पुढील प्रवास गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14