Homeठाणेठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट: प्रशासनाचा नवा आदर्श

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट: प्रशासनाचा नवा आदर्श

ई-गव्हर्नन्स उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा प्रशासनाचा राज्यस्तरीय गौरव

  • नवी मुंबई : प्रतिनिधी

दिनांक: 29 मार्च 2026

ठाणे जिल्ह्याचा ‘डिजिटल कायापालट’ हा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला असून, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या लोकाभिमुख प्रशासकीय प्रारूपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

पारदर्शक प्रशासनासाठी डिजिटल उपक्रम

जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार,दि.28 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणे जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील ई-गव्हर्नन्स सेवांसाठी QR कोड आणि WhatsApp तक्रार प्रणाली वापरताना नागरिक व कर्मचारी
ठाणे जिल्ह्यात QR कोड व WhatsApp आधारित डिजिटल सेवांद्वारे नागरिकांना सुलभ सेवा

प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी डॉ.पांचाळ यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘सेवा संवाद’ आणि ‘डिजी संवाद’ सारखे महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या ‘सेवा संवाद’ या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजात मोठी शिस्त आली आहे. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध असलेल्या QR-Code मुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा, सरकारी दरपत्रकाची अचूकता आणि केंद्र चालकाचे वर्तन यावर थेट ऑनलाईन अभिप्राय देण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

“ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट हा राज्यातील प्रशासनासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.”

या रेटिंग प्रणालीमुळे केंद्र चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असून, अतिरिक्त शुल्काच्या तक्रारींवरही प्रभावी नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना तक्रार निवारणासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ‘डिजी संवाद’ या WhatsApp आधारित (९९३०००११८५) उपक्रमाद्वारे २४x७ तक्रार नोंदणीची सुविधा दिली गेली आहे. घरबसल्या केवळ एका मेसेजद्वारे तक्रार नोंदवणे आणि तिचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य झाल्याने प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यात जुने जन्म-मृत्यू रजिस्टर आणि डिजिटल जमीन नोंदी संगणकावर तपासताना कर्मचारी
ठाणे जिल्ह्यात ऐतिहासिक नोंदी आणि जमीन व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

ऐतिहासिक नोंदी आणि जमीन व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर

केवळ दैनंदिन कामकाजातच नव्हे, तर ऐतिहासिक वारसा जतन करण्यातही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दूरदृष्टी दाखवली आहे. ‘ई-संजीवन’ प्रणालीच्या माध्यमातून १८९० पासूनची जन्म-मृत्यू नोंदणीची जुनी ‘कोतवाल रजिस्टर्स’ आता AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित करण्यात आली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या नोंदी शोधणे आता काही सेकंदांचे काम झाले आहे.

तसेच, ‘राजभूमी’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय जमिनींचे डिजिटल व्यवस्थापन सुरू करून प्रशासनाने भू-माफियांवर मोठा वचक बसवला आहे. अक्षांश-रेखांश आणि जिओ-रेफरन्सिंगमुळे सरकारी जमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित झाले असून, ‘लँड बँक’ सुविधेमुळे विकास प्रकल्पांसाठी जागा निवडणे आता अधिक सुलभ झाले आहे.

आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचे डिजिटल मॅपिंग

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचेही डिजिटल मॅपिंग डॉ. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय शाळा आणि आपत्कालीन सेवांची माहिती नकाशावर उपलब्ध केल्यामुळे सामान्य नागरिकांना या सेवा शोधणे सुलभ झाले आहे.

मुख्य रस्त्यांचे जाळे आणि ड्रेनेज व्यवस्थेची डिजिटल माहिती उपलब्ध असल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करणे शक्य झाले आहे. अतिदुर्गम शहापूर-मुरबाडपासून ते गजबजलेल्या ठाणे-कल्याणपर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे.

ठाणे जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचे डिजिटल मॅपिंग करताना अधिकारी लॅपटॉपवर काम करताना
ठाणे जिल्ह्यात डिजिटल मॅपिंगद्वारे आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचे नियोजन

‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या या मूलभूत परिवर्तनासाठी आज एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचा गौरव करण्यात आला.

हा सन्मान ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आणि समस्त ठाणेकरांसाठी अभिमानास्पद असून, डॉ.पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी कार्यान्वित झालेल्या या डिजिटल अध्यायाने प्रशासकीय उत्तरदायित्वाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

[येथे संबंधित बातमी वाचा] https://navimumbaiheadlines.com/thane-msme-boost
[अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा] https://divcomkonkan.gov.in/

📍 प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा.

Navi Mumbai Headlines
Navi Mumbai Headlineshttp://www.navimumbaiheadlines.com
Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई व परिसरातील विश्वासार्ह, स्वतंत्र आणि जबाबदार डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाशी संबंधित घडामोडी, स्थानिक प्रश्न, प्रशासनाचे निर्णय, राजकारण, गुन्हे, विकासकामे, शिक्षण, आरोग्य तसेच जनतेशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सत्य, अचूक आणि निष्पक्षपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत असताना, Navi Mumbai Headlines हे पोर्टल जबाबदार पत्रकारितेच्या मूल्यांवर ठाम राहून केवळ सत्याची पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि लोकहित हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. About Us Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी, विकास व जनहिताशी संबंधित विषयांवर आधारित स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक दबावाशिवाय कार्यरत असून, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करते. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दुर्लक्षित विषय आणि सकारात्मक घडामोडी समाजासमोर आणणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Navi Mumbai Headlines हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, लोकशाही मूल्ये जपणारे आणि जनजागृती करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Editor – Founder Bio कुलदीप देशपांडे संपादक व संस्थापक – Navi Mumbai Headlines कुलदीप देशपांडे हे पत्रकारिता, सामाजिक विषय आणि जनहिताशी संबंधित लेखनाचा अनुभव असलेले संपादक आहेत. स्थानिक प्रश्न, प्रशासन, समाजातील घडामोडी आणि सामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणे हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, Navi Mumbai Headlines या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास जपणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. 📞 Contact Us 📍 पोर्टल नाव: Navi Mumbai Headlines 📧 ई-मेल: navimumbaiheadlines@gmail.com 📱 मोबाईल: +91 8104303894 🌐 वेबसाईट: https://www.navimumbaiheadlines.com 🏙️ कार्यक्षेत्र: नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत 👉 कोणत्याही बातमीविषयी सूचना, तक्रार, प्रतिक्रिया किंवा जाहिरातीसाठी वरील संपर्क माध्यमांचा वापर करावा. ⚠️ Disclaimer या वेबसाइटवरील सर्व बातम्या, लेख, माहिती आणि मते ही सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवेदने, उपलब्ध माहिती आणि संपादकीय अभ्यासावर आधारित आहेत. कोणत्याही बातमीमुळे थेट किंवा अप्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानासाठी Navi Mumbai Headlines जबाबदार राहणार नाही. पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बाह्य लिंक्स किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित तृतीय पक्षाची राहील. 🧑‍⚖️ Editorial Policy Navi Mumbai Headlines खालील संपादकीय धोरणांचे पालन करते: सर्व बातम्या सत्य पडताळणी करूनच प्रसिद्ध केल्या जातात. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात हेतुपुरस्सर मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. बातमी व मत (News & Opinion) यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो. अफवा, अप्रमाणित माहिती किंवा द्वेष पसरवणारा मजकूर टाळला जातो. आवश्यक असल्यास बातमीमध्ये सुधारणा (Correction/Update) करण्यात येते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि पत्रकारितेची मूल्ये हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular