HomeBlogरिझर्व बँक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर: RBI स्थापनेचा इतिहास

रिझर्व बँक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर: RBI स्थापनेचा इतिहास

RBI दिवसानिमित्त जाणून घ्या इतिहास आणि आंबेडकरांचे योगदान

नवी मुंबई : प्रतिनिधी

रिझर्व बँक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर
1 एप्रिल हा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ची स्थापना झाली. त्यामुळे 1 एप्रिल हा दिवस “आरबीआय दिवस” म्हणूनही ओळखला जातो. 1 एप्रिल 1935 हा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि चालवली जाणारी देशाची मध्यवर्ती बँक आहे. चलनविषयक धोरण, बँकांचे नियमन, आर्थिक स्थैर्य राखणे आणि महागाई नियंत्रण ही या बँकेची मुख्य कार्ये आहेत.

“१ एप्रिल हा दिवस फक्त RBI दिवस नसून भारताच्या आर्थिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे.”

रिझर्व बँकेची स्थापना कशी झाली?…

भारतासाठी मध्यवर्ती बँकेची कल्पना सर्वप्रथम 1771 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज यांनी मांडली होती. त्यानंतर 1926 मध्ये हिल्टन यंग आयोगाने भारतासाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली. या शिफारशीच्या आधारे 6 मार्च 1934 रोजी आरबीआय कायदा संसदेत मंजूर करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची अधिकृत स्थापना झाली.

“भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही केवळ प्रशासकीय निर्णय नव्हती, तर ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची फलश्रुती होती.”

सुरुवातीला या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे होते. नंतर 1937 मध्ये ते कायमस्वरूपी मुंबई येथे हलविण्यात आले.

पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ हे होते. त्यांचा कार्यकाळ 1 एप्रिल 1935 पासून ते 1 जून 1937 पर्यंत होता. पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी.डी. देशमुख यांनी कार्यभार सांभाळला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडिया ने जून 1948 पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम केले. रिझर्व बँकेचे 1949 मध्ये भारत सरकार द्वारे राष्ट्रीयीकरण केले गेले.

भारतीय चलनप्रणाली आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे प्रतिनिधित्व करणारे दृश्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रातील योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे संविधान निर्माते नव्हते, तर ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांनी भारतातील अर्थव्यवस्था, शेती, चलनप्रणाली आणि कामगार धोरण यांचा सखोल अभ्यास केला होता.

या ग्रंथात त्यांनी भारतीय चलनप्रणालीतील त्रुटी, रुपयाचे अवमूल्यन आणि त्यावर उपाय यांचे सखोल विश्लेषण केले. हिल्टन यंग आयोगाने भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना करताना या पुस्तकातील विचारांचा आधार घेतला होता. आर्थिक विकासासंदर्भात डॉ. आंबेडकर यांच्या मते, अल्पभूधारक घटकांवर आधारित भारतीय शेतीची उत्पादकता व उत्पन्न कमी असण्याचे मूळ कारण म्हणजे शेतीमधील अल्प भांडवली गुंतवणूक आहे. फक्त शेतीच नव्हे, तर कामगारांचे आर्थिक धोरण यावर सुद्धा त्यांनी विस्तृत विचार मांडले आहेत.

भारतीय चलन, नाणी आणि अर्थशास्त्र विषयक पुस्तके यांसह अभ्यासाचे टेबल दृश्य
भारतीय चलनप्रणाली आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे प्रतिनिधित्व करणारे दृश्य

डॉ. आंबेडकरांनी भारतातील संपूर्ण घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला होता. त्यात भारतीय अर्थव्यवस्था व त्यावरील समस्यांचे उपाय यावर त्यांनी जागतिक दर्जाच्या तीन पदव्या संपादन केल्या होत्या. अर्थशास्त्रावर 3 प्रबंध कोलंबिया (अमेरिका) व लंडन विद्यापीठात सादर केले. विशेष म्हणजे तीनही प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले. ते 3 प्रबंध म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि वित्तप्रणाली, ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती, भारतीय रुपयाचा प्रश्न (दि प्रॉब्लेम ऑफ रुपी) हे होत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रबंध होता.

“The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution” (1923).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ह्या प्रबंधाचे पुस्तकात रूपांतर होऊन 1923 साली लंडनमध्ये प्रकाशित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेची रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. या बँकेची स्थापना 1926 च्या रॉयल संस्थेच्या शिफारसीच्या आधारे झाली. या बँकेचा मूळ शिक्का म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचे चिन्ह – म्हणजेच नारळाचे झाड आणि सिंह असे होते. पण त्या चिन्हात बदल करण्यात आला आणि सिंहाऐवजी भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ याचा चिन्हात समावेश करण्यात आला. सुरुवातीला मुख्य कार्यालय कोलकाता येथे होते, जे 1937 मध्ये कायमस्वरूपी मुंबईत हलविण्यात आले. भारतीय रिझर्व्ह बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक, सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्ण वेळ गव्हर्नर, चार डेप्युटी गव्हर्नर, 16 सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक 1934 च्या आरबीआय कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांसाठी केली जाते.

मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडिया इमारतीसमोर चालणारी दैनंदिन हालचाल
मुंबईतील रिझर्व बँकेच्या मुख्यालयाबाहेरची दैनंदिन वर्दळ

रिझर्व बँकेच्या स्थापनेत आंबेडकरांचे योगदान..

डॉ. आंबेडकरांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून भारतासाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक असणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले. त्यांच्या “The Problem of the Rupee” या पुस्तकातील विचारांवर आधारितच भारतातील चलन आणि बँकिंग व्यवस्था सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या मुळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय ज्ञान आणि दूरदृष्टी होती, याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे.

रिझर्व बँकेची प्रमुख कार्ये..

भारतीय रिझर्व्ह बँकेची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे आहेत :

  • चलनी नोटा जारी करणे
  • केंद्र व राज्य सरकारची बँक म्हणून काम करणे
  • व्यावसायिक बँकांचे नियमन व नियंत्रण करणे
  • महागाई नियंत्रणासाठी मौद्रिक धोरण जाहीर करणे
  • देशातील आर्थिक स्थैर्य राखणे

डॉ. आंबेडकरांनी सुचवलेली मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली यावर आजही ही बँक खंबीरपणे उभी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 साली 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे विमुद्रिकरण (नोटाबंदी) केले. ही मूळ संकल्पना डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या “द प्रॉब्लेम ऑफ रुपी” या पुस्तकातून घेण्यात आली होती.

रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑसबोर्न स्मिथ यांच्याशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रे आणि वस्तू
भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑसबोर्न स्मिथ यांच्या कार्यकाळाची झलक

रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर..

भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सर ऑसबोर्न स्मिथ होते. त्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी. डी. देशमुख यांनी कार्यभार सांभाळला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतर अर्थशास्त्रज्ञांचे मत…

भारताचे नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांचा आदर करतात. ते असे म्हणतात की, “डॉ. आंबेडकर हे माझ्या वडिलांसमान आहेत, त्यांच्या एवढ्या जागतिक कीर्तीचा महान अर्थशास्त्रज्ञ होणे नाही.” लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सुद्धा सुरू करण्यात आले आहे.

[येथे संबंधित बातमी वाचा] https://navimumbaiheadlines.com/digital-rupee-india

[अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा – Outbound Link] https://divcomkonkan.gov.in/

थोडक्यात सांगायचे तर, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही केवळ एक प्रशासकीय निर्णय नव्हती, तर ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रीय विचारांची आणि दूरदृष्टीची फलश्रुती होती. म्हणूनच 1 एप्रिल हा दिवस केवळ “आरबीआय दिवस” नसून भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

जयश्री कल्पना अशोक साळुंखे
अधिव्याख्याता संगणक अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे
संपर्क:- 8551066975

📍 प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा.

Navi Mumbai Headlines
Navi Mumbai Headlineshttp://www.navimumbaiheadlines.com
Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई व परिसरातील विश्वासार्ह, स्वतंत्र आणि जबाबदार डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाशी संबंधित घडामोडी, स्थानिक प्रश्न, प्रशासनाचे निर्णय, राजकारण, गुन्हे, विकासकामे, शिक्षण, आरोग्य तसेच जनतेशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सत्य, अचूक आणि निष्पक्षपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत असताना, Navi Mumbai Headlines हे पोर्टल जबाबदार पत्रकारितेच्या मूल्यांवर ठाम राहून केवळ सत्याची पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि लोकहित हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. About Us Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी, विकास व जनहिताशी संबंधित विषयांवर आधारित स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक दबावाशिवाय कार्यरत असून, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करते. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दुर्लक्षित विषय आणि सकारात्मक घडामोडी समाजासमोर आणणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Navi Mumbai Headlines हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, लोकशाही मूल्ये जपणारे आणि जनजागृती करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Editor – Founder Bio कुलदीप देशपांडे संपादक व संस्थापक – Navi Mumbai Headlines कुलदीप देशपांडे हे पत्रकारिता, सामाजिक विषय आणि जनहिताशी संबंधित लेखनाचा अनुभव असलेले संपादक आहेत. स्थानिक प्रश्न, प्रशासन, समाजातील घडामोडी आणि सामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणे हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, Navi Mumbai Headlines या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास जपणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. 📞 Contact Us 📍 पोर्टल नाव: Navi Mumbai Headlines 📧 ई-मेल: navimumbaiheadlines@gmail.com 📱 मोबाईल: +91 8104303894 🌐 वेबसाईट: https://www.navimumbaiheadlines.com 🏙️ कार्यक्षेत्र: नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत 👉 कोणत्याही बातमीविषयी सूचना, तक्रार, प्रतिक्रिया किंवा जाहिरातीसाठी वरील संपर्क माध्यमांचा वापर करावा. ⚠️ Disclaimer या वेबसाइटवरील सर्व बातम्या, लेख, माहिती आणि मते ही सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवेदने, उपलब्ध माहिती आणि संपादकीय अभ्यासावर आधारित आहेत. कोणत्याही बातमीमुळे थेट किंवा अप्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानासाठी Navi Mumbai Headlines जबाबदार राहणार नाही. पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बाह्य लिंक्स किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित तृतीय पक्षाची राहील. 🧑‍⚖️ Editorial Policy Navi Mumbai Headlines खालील संपादकीय धोरणांचे पालन करते: सर्व बातम्या सत्य पडताळणी करूनच प्रसिद्ध केल्या जातात. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात हेतुपुरस्सर मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. बातमी व मत (News & Opinion) यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो. अफवा, अप्रमाणित माहिती किंवा द्वेष पसरवणारा मजकूर टाळला जातो. आवश्यक असल्यास बातमीमध्ये सुधारणा (Correction/Update) करण्यात येते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि पत्रकारितेची मूल्ये हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular