महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या जाणवणारी थंडी आता हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण पट्ट्यात तापमानात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सकाळची गारवा कमी होऊन दिवसाच्या तापमानात वाढ जाणवणार आहे. तर नाशिक, अहिल्यानगर (नगर), धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील भागांतही थंडीचा प्रभाव ओसरत असल्याचे चित्र आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत किमान तापमानात हळूहळू वाढ होणार असून, थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतही थंड वाऱ्यांचा जोर कमी होणार आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर आता कमी होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यभरात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून, सध्या पावसाची कोणतीही शक्यता नाही. मात्र किनारपट्टी भागात दमट हवामान जाणवू शकते.
हवामानातील या बदलाचा परिणाम शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांवर होणार असून, तापमान वाढीमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14






