दुपारपासून रात्री ११:३० पर्यंत थरार; अखेर सुखरूप शेवट
“मी ड्युटीवर आहे, मला प्रसिद्धी नको” – खऱ्या समाजसेवेचा आदर्श
नवी मुंबई | प्रतिनिधी
दिनांक 16-01-2026 रोजी नव्याने निवडून आलेले Bharatiya Janata Party (BJP) चे प्रभाग क्रमांक–4 चे नगरसेवक श्री. शिवाजी खोपडे यांनी निवडणुकीनंतर लगेचच जनतेच्या सेवेला प्राधान्य देत एक आदर्शवत काम करून दाखवले.
18-01-2026 रोजी ऐरोली सेक्टर–17 येथून एक ११ वर्षांची मुलगी दुपारी २ ते ३ दरम्यान “क्लासला जाते” असे सांगून घरातून निघून गेली. मात्र क्लास सुटूनही ती घरी न आल्याने आई-वडिलांनी क्लासमध्ये चौकशी केली असता, मुलगी त्या दिवशी क्लासला आलीच नसल्याचे समोर आले. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली.
ही माहिती नगरसेवक श्री. शिवाजी खोपडे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी वेळ न दवडता घटनास्थळी हजर राहून स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. आजूबाजूच्या परिसरातील गल्ल्या, रस्ते तसेच CCTV फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये मुलगी एकटी जाताना दिसली, मात्र पुढील ठोस माहिती मिळू शकली नाही.
संध्याकाळपर्यंत सर्वत्र शोध घेऊनही मुलगी सापडली नाही. अखेर रात्री पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत नागरिक, कार्यकर्ते आणि कुटुंबीय सातत्याने शोध घेत होते.

दरम्यान, रात्री सुमारे ११:३० वाजता दिघा परिसरात एका फूड डिलिव्हरी बॉयला ही मुलगी गोंधळलेल्या अवस्थेत दिसली. त्याने थांबून चौकशी केली असता मुलीने सांगितले, “मी हरवले आहे, मला रस्ता सापडत नाही.”
त्याने शांतपणे तिचे नाव व पत्ता विचारून घेतला आणि तिला सुरक्षितपणे दुचाकीवरून घरी पोहोचवले.

घरासमोर शेकडो लोक जमा झालेले पाहून तो तरुण घाबरला होता. तो दक्षिण भारतीय असल्याने त्याला मराठी तसेच हिंदी नीट येत नव्हते, तरीही त्याचा उद्देश पूर्णपणे माणुसकीचा होता. त्याच्याकडे अजूनही डिलिव्हरीची पार्सल्स असल्याने, मुलीला सुरक्षित सोडून त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले—
“माझा फोटो किंवा व्हिडीओ काढू नका, माझं नाव कुठेही घेऊ नका. मी ड्युटीवर आहे, मला प्रसिद्धी नको आहे.” 🙏
कोणताही गवगवा न करता तो पुढील डिलिव्हरीसाठी निघून गेला.
या क्षणी हरवलेली मुलगी सुरक्षितपणे घरी परतल्याने उपस्थित सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला. नगरसेवक श्री. शिवाजी खोपडे यांनी त्या डिलिव्हरी बॉयचे मनापासून कौतुक केले व त्याचा सत्कार केला. बक्षीस म्हणून काही रक्कम देऊ केली असता, त्या तरुणाने ती नम्रपणे नाकारली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून अशी अपेक्षा व्यक्त होत आहे की, नवी मुंबईचे पालकमंत्री Ganesh Naik यांच्या हस्ते नगरसेवक श्री. शिवाजी खोपडे तसेच त्या निस्वार्थ डिलिव्हरी बॉयचा अधिकृत सत्कार व्हावा. कारण अशा समाजप्रती जागृत आणि कर्तव्यदक्ष व्यक्तींमुळेच आज नवी मुंबईतील एका कोवळ्या मुलीवर होऊ शकणारा मोठा अनर्थ टळला आहे.
मुलीच्या आई-वडिलांनी तसेच नागरिकांनी श्री. खोपडे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले असून, दुपारपासून रात्री ११:३०–१२ वाजेपर्यंत शोधात सहभागी झालेल्या सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
👉 अशा समाजसेवी लोकांचा सन्मान व्हावा, यासाठी ही बातमी शेअर करा. 🙏
📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा






