नवी मुंबई : श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत भव्य चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत पार पडणार आहे.
या उपक्रमामागे नवी मुंबईतील कला, संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्वांसाठी खुली असलेली ही स्पर्धा नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण करत आहे. चित्रकला व मेहंदी स्पर्धेमधून नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत आयोजित करण्यात येणारा कमल आनंद कलामंच प्रस्तुत ‘लावणी महोत्सव’. पारंपरिक मराठी लोककलेचा जागर करणारा हा लावणी कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.
हा भव्य कार्यक्रम सुनील गावस्कर मैदान, सेक्टर ९, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमंत्रक म्हणून श्रीमती मंदा विजय म्हात्रे, आमदार – बेलापूर विधानसभा, तसेच श्री. निलेश विजय म्हात्रे, महामंत्री – भाजप नवी मुंबई जिल्हा, यांचे विशेष योगदान आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणाऱ्या त्यांच्या पुढाकारामुळे हा महोत्सव साकार होत आहे.
नवी मुंबईकरांसाठी हा महोत्सव म्हणजे कला, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम ठरणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळवले आहे.
📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा






