नवी मुंबई : मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ₹33,13,299/- किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित नागरिकांना परत करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारातून आयोजित या विशेष कार्यक्रमामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त, परिमंडळ–२ (बेलापूर) यांच्या संकल्पनेतून सीबीडी, पोर्ट विभागांतर्गत नेरूळ, एन.आर.आय. सागरी, सीबीडी, उलवे, न्हावा शेवा, उरण आणि मोरा सागरी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध मालमत्ता गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात फिर्यादी व साक्षीदारांना त्यांचा मुद्देमाल अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमात मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी तसेच दुचाकी वाहने असा विविध प्रकारचा मुद्देमाल संबंधित लाभार्थ्यांना परत देण्यात आला.
या उपक्रमामुळे गुन्ह्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, “जप्त मुद्देमाल केवळ गुन्हे तपासापुरताच नाही तर योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे,” असा संदेश नवी मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.
नवी मुंबई पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या विश्वासासाठी सदैव तत्पर असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवले जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14






