Homeठाणेनमुंमपा जागर व्याख्यानमाला: बाबासाहेबांच्या विचारांतून घराघरात लोकशाही

नमुंमपा जागर व्याख्यानमाला: बाबासाहेबांच्या विचारांतून घराघरात लोकशाही

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम

नवी मुंबई : प्रतिनिधी

नमुंमपा जागर व्याख्यानमाला या उपक्रमातून घराघरात लोकशाहीची मूल्ये रुजतील, असा ठाम विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केला. समानता हवेतून येणार नाही, तर बाबासाहेबांचे विचार घराघरात आणावे लागतील, मग घरामध्ये आपोआप लोकशाही येईल अशा शब्दात त्यांनी आपले विचार मांडले.

नमुंमपा जागर 2026 व्याख्यानमालेत मान्यवरांकडून स्मृतिचिन्ह प्रदान करताना
नवी मुंबईत ‘जागर 2026’ व्याख्यानमालेत मान्यवरांकडून सन्मान सोहळा

Navi Mumbai Municipal Corporation तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून ऐरोली सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात 3 ते 13 एप्रिल या कालावधीत ‘जागर 2026’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

नमुंमपा जागर व्याख्यानमाला कार्यक्रमात समानतेचा संदेश

महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, लेखक-उद्योजक प्रफुल्ल वानखेडे, अंकुश सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुंबईला जाता-येताना लांबून दिसणारे हे भव्य स्मारक प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आज पूर्ण झाली, अशी भावना वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केली. तसेच आधुनिक शहरात व्याख्यान परंपरा जोपासली जात असल्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

“समानता हवेतून येणार नाही; बाबासाहेबांचे विचार घराघरात रुजवले तरच खरी लोकशाही निर्माण होईल.” – ॲड. वर्षा देशपांडे

स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते; मात्र तिला समान माणूस म्हणून स्वीकारले जात नाही, ही वस्तुस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. देवी म्हणून पूजणे किंवा दासी म्हणून हिणवणे यापेक्षा स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तन

नमुंमपा जागर व्याख्यानमाला अंतर्गत बोलताना त्यांनी स्त्रीच्या संघर्षाचे विविध पैलू उलगडले. शेतीचा शोध स्त्रीने लावला, तिच्याकडे सृजनशक्ती आहे, त्यामुळे तिचे महत्त्व ओळखून ते प्रत्यक्ष व्यवहारात स्वीकारले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मालमत्तेत महिलांचे नाव जोडण्यासाठीचा संघर्ष, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीची चळवळ, तसेच दारूबंदी आंदोलन यांसारख्या अनेक घटनांचा उल्लेख त्यांनी केला. दारूबंदी यशस्वी झालेल्या गावांमध्ये महिला सरपंच असल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले.

परिवर्तनाच्या चळवळीचे आम्ही इंजिन आहोत, असे सांगताना संसार हा दोन चाकांचा रथ असला तरी नियंत्रण पुरुषांकडेच असते, ही वस्तुस्थिती बदलून समानतेवर आधारित समाज घडविण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
आज महिला विविध क्षेत्रात आघाडीवर असून त्यांना नोकरी, व्यवसाय आणि घराची जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे ‘सुपर वूमन’ होण्याच्या ओझ्याखाली दबण्याऐवजी आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला.

[येथे संबंधित बातमी वाचा] https://navimumbaiheadlines.com/nmmc-previous-news

नमुंमपा जागर 2026 व्याख्यानमालेत व्यासपीठावरून मान्यवरांचे संबोधन
‘जागर 2026’ व्याख्यानमालेत नवी मुंबईत मान्यवरांचे मार्गदर्शन

महापौरांचा विश्वास आणि उपक्रमांची माहिती

महापौर सुजाता पाटील यांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या विचारांमुळेच महिलांना नेतृत्वाची संधी मिळाल्याचे सांगितले. लखपती दीदी योजना तसेच एनएमएमटी बस सेवेत महिलांना वाहनचालक म्हणून प्रशिक्षण देण्यासारखे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी व्याख्यानमालेची वैशिष्ट्ये सांगताना 2022 पासून हा उपक्रम सुरू असल्याचे नमूद केले.

[अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा] https://nmmc.gov.in/navimumbai

📍 प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा.

Navi Mumbai Headlines
Navi Mumbai Headlineshttp://www.navimumbaiheadlines.com
Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई व परिसरातील विश्वासार्ह, स्वतंत्र आणि जबाबदार डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाशी संबंधित घडामोडी, स्थानिक प्रश्न, प्रशासनाचे निर्णय, राजकारण, गुन्हे, विकासकामे, शिक्षण, आरोग्य तसेच जनतेशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सत्य, अचूक आणि निष्पक्षपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत असताना, Navi Mumbai Headlines हे पोर्टल जबाबदार पत्रकारितेच्या मूल्यांवर ठाम राहून केवळ सत्याची पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि लोकहित हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. About Us Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी, विकास व जनहिताशी संबंधित विषयांवर आधारित स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक दबावाशिवाय कार्यरत असून, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करते. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दुर्लक्षित विषय आणि सकारात्मक घडामोडी समाजासमोर आणणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Navi Mumbai Headlines हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, लोकशाही मूल्ये जपणारे आणि जनजागृती करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Editor – Founder Bio कुलदीप देशपांडे संपादक व संस्थापक – Navi Mumbai Headlines कुलदीप देशपांडे हे पत्रकारिता, सामाजिक विषय आणि जनहिताशी संबंधित लेखनाचा अनुभव असलेले संपादक आहेत. स्थानिक प्रश्न, प्रशासन, समाजातील घडामोडी आणि सामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणे हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, Navi Mumbai Headlines या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास जपणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. 📞 Contact Us 📍 पोर्टल नाव: Navi Mumbai Headlines 📧 ई-मेल: navimumbaiheadlines@gmail.com 📱 मोबाईल: +91 8104303894 🌐 वेबसाईट: https://www.navimumbaiheadlines.com 🏙️ कार्यक्षेत्र: नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत 👉 कोणत्याही बातमीविषयी सूचना, तक्रार, प्रतिक्रिया किंवा जाहिरातीसाठी वरील संपर्क माध्यमांचा वापर करावा. ⚠️ Disclaimer या वेबसाइटवरील सर्व बातम्या, लेख, माहिती आणि मते ही सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवेदने, उपलब्ध माहिती आणि संपादकीय अभ्यासावर आधारित आहेत. कोणत्याही बातमीमुळे थेट किंवा अप्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानासाठी Navi Mumbai Headlines जबाबदार राहणार नाही. पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बाह्य लिंक्स किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित तृतीय पक्षाची राहील. 🧑‍⚖️ Editorial Policy Navi Mumbai Headlines खालील संपादकीय धोरणांचे पालन करते: सर्व बातम्या सत्य पडताळणी करूनच प्रसिद्ध केल्या जातात. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात हेतुपुरस्सर मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. बातमी व मत (News & Opinion) यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो. अफवा, अप्रमाणित माहिती किंवा द्वेष पसरवणारा मजकूर टाळला जातो. आवश्यक असल्यास बातमीमध्ये सुधारणा (Correction/Update) करण्यात येते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि पत्रकारितेची मूल्ये हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular