HomeBlogदारूचे व्यसन : कसं लागतं? कसं वाढतं? कसं फसवतं आणि नक्कीच कसं...

दारूचे व्यसन : कसं लागतं? कसं वाढतं? कसं फसवतं आणि नक्कीच कसं सुटू शकतं

प्रस्तावना

दारूचं व्यसन ही एखाद्या व्यक्तीची कमजोरी नाही, तर मन, भावना, नातेसंबंध आणि परिस्थिती यांच्या एकत्रित अपयशातून निर्माण झालेली अवस्था आहे. सुरुवातीला दारू “टाइमपास”, “ताण कमी करण्याचं साधन” किंवा “सोबत” वाटते. पण हळूहळू तीच दारू सवय, मग गरज, आणि शेवटी व्यसन बनते. हा प्रवास इतका हळू आणि गोड वाटणारा असतो की कळायच्या आत आयुष्य हाताबाहेर गेलेलं असतं.

दारू म्हणजे काय? – अप्सरेच्या वेशातील चेटकीण

दारू दिसायला आकर्षक असते, पण आतून विनाशकारी. अप्सरेच्या वेशातील चेटकीणसारखी दारू हळूच आयुष्यावर ताबा मिळवते.

दारू ही “अप्सरेच्या वेशातील चेटकीण” आहे. दिसायला सुंदर, आकर्षक, चमचमीत—पण आतून पूर्णपणे विनाशकारी.
ती कुणालाच सोडत नाही. सामान्य माणसांपासून ते मोठे राजकारणी, नेते, कलाकार, श्रीमंत, बुद्धिमान लोक—सगळेच तिच्या तावडीत सापडले आहेत.
इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी—
कोणताही ब्रँड सुरक्षित नसतो.
महागडी दारू असो किंवा स्वस्त, देशी असो किंवा विदेशी—दारू म्हणजे दारू. घातकपणा सगळ्याच प्रकारात तोच असतो.

आधी समजून घेऊ : दारू नक्की काय करते?

दारूची “Multiplication Technique”

दारूचा सगळ्यात मोठा धोका हा आहे की ती भावना वाढवते (multiply करते).
ती भावना बदलत नाही, बरी करत नाही—ती फक्त तीव्र करते.

  • राग असेल → रागाला गुणाकार
  • दुःख असेल → दुःखाला गुणाकार
  • प्रेम ओसंडत असेल → प्रेमाला अतिरेक
  • आनंद असेल → बेभान आनंद

म्हणजे दारू “उपचार” नाही, ती भावनांचा अॅम्प्लिफायर आहे.
आणि जिथे भावना आधीच अस्थिर आहेत, तिथे हा गुणाकार माणसाला खोल गर्तेत घेऊन जातो.

दारूची सवय कशी लागते?

1) ताण आणि मानसिक दडपण

आजचं आयुष्य स्पर्धेचं आहे. नोकरीचा ताण, व्यवसायातील अनिश्चितता, पैशांची चणचण, जबाबदाऱ्या—या सगळ्यामुळे मनावर सतत दडपण असतं. या ताणातून क्षणभर सुटका हवी म्हणून दारूचा पहिला घोट घेतला जातो. त्या क्षणी मन हलकं वाटतं. मेंदू हा अनुभव लक्षात ठेवतो—
“दारू = आराम”
इथूनच सवयीचा बीज रोवला जातो.

2) अपयश आणि नैराश्य

एकदा किंवा वारंवार येणारी अपयशं—परीक्षेत नापास, नोकरी न मिळणं, व्यवसायात तोटा, प्रेमात नकार—मनाला खोलवर जखम करतात. “आपण काहीच कामाचे नाही” ही भावना वाढते. या नैराश्यापासून पळ काढण्यासाठी दारू एक सोपा मार्ग वाटतो. पण हा मार्ग खाली नेणारा असतो.

3) घरात कुणी ऐकून घेणारा नाही

अनेक व्यसनी लोक एकच वाक्य सांगतात—
“माझं कुणी ऐकत नव्हतं.”
आई-वडिलांशी जमत नाही, सतत टोमणे, तुलना, गैरसमज—यामुळे घर सुरक्षित वाटेनासं होतं. भावना बोलण्यासाठी जागा राहत नाही. अशावेळी दारू हीच “सोबतीण” बनते.

4) दारू पिणारेच आपलं कुटुंब वाटू लागतं

हळूहळू दारू पिणारे मित्रच आपले वाटू लागतात. तिथे कोणी उपदेश करत नाही, कोणी प्रश्न विचारत नाही.
पण हे लक्षात ठेवा—
हे कुटुंब दारू असेपर्यंतच तुमच्यासोबत असतं.
तुम्ही कोसळलात, आजारी पडलात, थांबलात—तर हे लोक गायब होतात.

एक महत्त्वाचा इशारा : दारू कधीच एकट्याने पिऊ नका

हा मुद्दा फार गंभीर आहे.
माणूस जेव्हा एकटा, नैराश्यग्रस्त, दुखावलेला असतो, तेव्हा भावना कमालीच्या तीव्र होतात.
आणि अशा वेळी दारू घेतली, की ती भावना अनेक पटींनी वाढते.

एकटेपणा + दारू = व्यसनाचा वेग वाढतो
याच अवस्थेत माणूस चुकीचे निर्णय घेतो, स्वतःला किंवा इतरांना इजा करतो.

भावना जितक्या तीव्र, ओढ तितकी तीव्र

दारूची ओढ ही शारीरिकपेक्षा भावनिक जास्त असते.
राग, दुःख, अपमान, भीती, एकटेपणा—या भावना जशा तीव्र, तशी दारूची ओढ तीव्र.
मग सुरू होते खरी व्यसनधीनता.
आता दारू नुसती सवय नसते, ती “हवीच” असते.

व्यसनाचे परिणाम : जेव्हा खूप उशीर झालेला असतो

एकटेपणा, तुटलेली वेळ आणि रिकामेपण—दारूच्या व्यसनाचा शेवट बहुतेक वेळा अशाच अवस्थेत होतो, जेव्हा खूप काही हातातून निसटलेलं असतं.

1) आरोग्य

  • High BP
  • Brain Stroke
  • Heart Attack
  • Liver Problems
  • झोप न लागणं, स्मरणशक्ती कमी होणं

2) पैसा आणि वेळ

दारू पैसे, वेळ, ऊर्जा—सगळं खात जाते.
आयुष्यातील मौल्यवान वर्षे कळायच्या आत निघून जातात.

3) उशिरा येणारी जाणीव

बहुतेक वेळा जाग येते ती मोठा धक्का बसल्यावर
स्ट्रोक, हार्ट अटॅक, लिव्हर डॅमेज.
तेव्हा वाटतं, “आता खूप उशीर झाला.”

पण अजूनही वेळ गेलेली नसते

श्वास सुरू आहे, मनात बदलायची इच्छा आहे—याचा अर्थ आशा जिवंत आहे.
दारूचं व्यसन सुटू शकतं.
नक्की सुटू शकतं.

व्यसन सुटण्यासाठी प्रभावी उपाय

उपाय 1 : “उद्या पिणार” तंत्र

सकाळी स्वतःला सांगा—
“आज नाही, उद्या पिणार.”
दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच.
हळूहळू एक दिवस, आठवडा, महिना…
मेंदूला अचानक धक्का न देता सवय बदलण्याचा हा मार्ग आहे.

उपाय 2 : आई-वडिलांशी नातं दुरुस्त करणं

जिथे जखम झाली, तिथेच औषध आहे.
बोलून किंवा लिहून सगळं प्रामाणिकपणे सांगा—
राग, वेदना, चुका.
त्या दिवशी जाणवेल—मन किती हलकं झालं आहे.

उपाय 3 :विपश्यना : व्यसनमुक्तीचा खोल आणि शाश्वत मार्ग

(या भागासाठीच हा लेख लिहिला गेला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही)

“या मुळे एका चे व्यसन जरी सुटलं तरी आपल्या लेखकाचे सार्थक झालं”
हेच या भागाचं आत्मसूत्र आहे.

आधी एक महत्त्वाचा गैरसमज दूर करूया

विपश्यना म्हणजे धर्म नाही, पूजा नाही, मंत्र नाही, चमत्कार नाही.
ती आहे स्वतःच्या आतल्या सत्याला प्रत्यक्ष अनुभवाने पाहण्याची शास्त्रीय पद्धत.

दारूचं व्यसन सुटण्यासाठी बाहेरचे उपाय कमी पडतात, कारण व्यसनाचं मूळ आत असतं—
मनात, भावनांमध्ये, शरीरात साठलेल्या प्रतिक्रिया (reaction) मध्ये.

विपश्यना नेमकं हेच मूळ तोडते.

विपश्यना ध्यानाने भावना पाहायला शिकता येतात. जिथे शांतता येते, तिथे व्यसनाची पकड हळूहळू सैल होते आणि नवी सुरुवात होते.

विपश्यना म्हणजे नेमकं काय शिकवतात?

1) “तू तुझ्या भावना नाहीस” हे शिकवतात

आपण आयुष्यभर काय करतो?

  • राग आला → राग झालो
  • दुःख आलं → दुःखी झालो
  • ओढ आली → ओढीचा गुलाम झालो

विपश्यना पहिल्यांदा हे शिकवते की—
👉 भावना येतात, पण तू भावना नाहीस.

भावना ही एक घटना आहे.
ती येते… राहते… आणि जाते.

ही साधी गोष्ट अनुभवातून उमगली, की व्यसनाचा पाया हादरायला लागतो.

विपश्यना कशी शिकवतात? (खूप महत्त्वाचं)

टप्पा 1 : श्वासाचं निरीक्षण (Anapana)

सुरुवातीचे काही दिवस फक्त एकच काम—
नैसर्गिक श्वास बघायचा.

  • श्वास आत जातोय
  • श्वास बाहेर येतोय

बदलायचा नाही. कंट्रोल करायचा नाही.
फक्त बघायचा.

👉 यामुळे मनाला पहिल्यांदा कळतं—
“अरे, आपण लक्ष देऊ शकतो… प्रतिक्रिया न देता.”

दारू पिणारा माणूस आयुष्यभर reaction मध्ये जगलेला असतो.
विपश्यना त्याला response शिकवते.

टप्पा 2 : शरीरातील संवेदनांची जाणीव (Core of Vipassana)

यानंतर खरी विपश्यना सुरू होते.

डोळे बंद.
शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक भागात काय संवेदना आहेत ते बघायचं.

  • कुठे जडपणा
  • कुठे दुखणं
  • कुठे गरम
  • कुठे थंड
  • कुठे कंप
  • कुठे काहीच नाही

काहीही बदलायचं नाही.
फक्त साक्षीभावाने निरीक्षण.

इथेच व्यसन तुटायला लागतं

दारूची ओढ आली की काय होतं?

  • छातीत अस्वस्थता
  • पोटात घालमेल
  • डोक्यात बेचैनी
  • शरीरात ताण

पूर्वी काय व्हायचं?
👉 ओढ आली = दारू

विपश्यना काय शिकवते?
👉 ओढ आली =
“चला, बघूया शरीरात काय चाललंय.”

तुम्ही फक्त निरीक्षण करता.

आणि काही मिनिटांत लक्षात येतं—
👉 ती तीव्र संवेदना हळूहळू बदलते
👉 ती कायम राहत नाही
👉 ती आपोआप कमी होते

इथे मेंदूला नवीन धडा मिळतो—
“दारूशिवायही ही अवस्था निघून जाऊ शकते.”

हा क्षण म्हणजे व्यसनाच्या किल्ल्यावर पहिला भगदाड.

विपश्यना एक फार धोकादायक सत्य शिकवते,

“सगळं अनित्य आहे”

विपश्यना मध्ये प्रत्यक्ष अनुभव येतो की—

  • राग अनित्य
  • दुःख अनित्य
  • आनंद अनित्य
  • ओढ अनित्य

जे अनित्य आहे, त्यासाठी स्वतःला संपवायचं का?

दारू कंपन्या काय विकतात?
👉 “हे प्यायलात तर बरं वाटेल.”

विपश्यना काय शिकवते?
👉 “बरं वाटणं आणि वाईट वाटणं दोन्ही येऊन जातं.”

बस.
इथेच त्यांचा खेळ संपतो.

विपश्यना आणि भावना : फार मोठा फरक

विपश्यना भावना दाबायला शिकवत नाही.
विपश्यना भावना सोडायला शिकवते.

  • राग आला → बघ
  • ओढ आली → बघ
  • दुःख आलं → बघ

न पळता.
न चिकटता.

दारूची गरज कुठे असते?
👉 भावना सहन न झाल्यावर.

विपश्यना काय देते?
👉 भावना सहन करण्याची नाही,
👉 भावना समजून घेण्याची ताकद.

मग व्यसन कसं सुटतं?

हळूहळू असं होतं—

  • ओढ येते
  • पण ती पूर्वीसारखी तीव्र नसते
  • आली तरी टिकत नाही
  • आणि गेल्यावर अपराधीपणाही राहत नाही

एक दिवस लक्षात येतं—
👉 “आज पिण्याची इच्छा आलीच नाही.”

हा चमत्कार नाही.
हा शास्त्रीय परिणाम आहे.

विपश्यना का टिकाऊ उपाय आहे?

कारण ती—

  • इच्छा मारत नाही
  • सवय दाबत नाही
  • भीती दाखवत नाही

ती फक्त अज्ञान काढून टाकते.

दारू = सुख
हा भ्रम तुटतो.

आणि भ्रम तुटला की—
व्यसन आपोआप कोसळतं.

शेवटचं (मनापासून)

जर हा लेख वाचून—

  • एक जरी माणूस म्हणाला
    “चला, एकदा विपश्यना करून पाहू”
  • एक जरी व्यसनी थांबला
  • एक जरी कुटुंब वाचलं

तर खरंच…

✍️ लेखकाचं आयुष्य सार्थक झालं 🙏

📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14

📍 प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा.

Navi Mumbai Headlines
Navi Mumbai Headlineshttp://www.navimumbaiheadlines.com
Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई व परिसरातील विश्वासार्ह, स्वतंत्र आणि जबाबदार डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाशी संबंधित घडामोडी, स्थानिक प्रश्न, प्रशासनाचे निर्णय, राजकारण, गुन्हे, विकासकामे, शिक्षण, आरोग्य तसेच जनतेशी निगडित महत्त्वाच्या बातम्या सत्य, अचूक आणि निष्पक्षपणे वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात अफवा, दिशाभूल करणारी माहिती आणि अप्रमाणित बातम्या मोठ्या प्रमाणावर पसरत असताना, Navi Mumbai Headlines हे पोर्टल जबाबदार पत्रकारितेच्या मूल्यांवर ठाम राहून केवळ सत्याची पडताळणी केलेली माहितीच प्रसिद्ध करते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि लोकहित हे आमच्या कार्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. About Us Navi Mumbai Headlines हे नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील बातम्या, सामाजिक प्रश्न, प्रशासन, राजकारण, गुन्हेगारी, विकास व जनहिताशी संबंधित विषयांवर आधारित स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल आहे. हे पोर्टल कोणत्याही राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक दबावाशिवाय कार्यरत असून, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करते. स्थानिक नागरिकांच्या समस्या, दुर्लक्षित विषय आणि सकारात्मक घडामोडी समाजासमोर आणणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Navi Mumbai Headlines हे केवळ बातम्यांचे माध्यम नसून, लोकशाही मूल्ये जपणारे आणि जनजागृती करणारे डिजिटल व्यासपीठ आहे. ✍️ Editor – Founder Bio कुलदीप देशपांडे संपादक व संस्थापक – Navi Mumbai Headlines कुलदीप देशपांडे हे पत्रकारिता, सामाजिक विषय आणि जनहिताशी संबंधित लेखनाचा अनुभव असलेले संपादक आहेत. स्थानिक प्रश्न, प्रशासन, समाजातील घडामोडी आणि सामान्य नागरिकांचे मुद्दे मांडणे हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. स्वतंत्र, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, Navi Mumbai Headlines या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून वाचकांचा विश्वास जपणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे. 📞 Contact Us 📍 पोर्टल नाव: Navi Mumbai Headlines 📧 ई-मेल: navimumbaiheadlines@gmail.com 📱 मोबाईल: +91 8104303894 🌐 वेबसाईट: https://www.navimumbaiheadlines.com 🏙️ कार्यक्षेत्र: नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत 👉 कोणत्याही बातमीविषयी सूचना, तक्रार, प्रतिक्रिया किंवा जाहिरातीसाठी वरील संपर्क माध्यमांचा वापर करावा. ⚠️ Disclaimer या वेबसाइटवरील सर्व बातम्या, लेख, माहिती आणि मते ही सार्वजनिक स्रोत, अधिकृत निवेदने, उपलब्ध माहिती आणि संपादकीय अभ्यासावर आधारित आहेत. कोणत्याही बातमीमुळे थेट किंवा अप्रत्यक्ष होणाऱ्या नुकसानासाठी Navi Mumbai Headlines जबाबदार राहणार नाही. पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, बाह्य लिंक्स किंवा तृतीय पक्षाच्या वेबसाईटवरील मजकुरावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याबाबतची जबाबदारी संबंधित तृतीय पक्षाची राहील. 🧑‍⚖️ Editorial Policy Navi Mumbai Headlines खालील संपादकीय धोरणांचे पालन करते: सर्व बातम्या सत्य पडताळणी करूनच प्रसिद्ध केल्या जातात. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात हेतुपुरस्सर मजकूर प्रसिद्ध केला जात नाही. बातमी व मत (News & Opinion) यामध्ये स्पष्ट फरक ठेवला जातो. अफवा, अप्रमाणित माहिती किंवा द्वेष पसरवणारा मजकूर टाळला जातो. आवश्यक असल्यास बातमीमध्ये सुधारणा (Correction/Update) करण्यात येते. वाचकांचा विश्वास, पारदर्शकता आणि पत्रकारितेची मूल्ये हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular