नवी मुंबई महानगरपालिकेतील नवनिर्वाचित शिवसेना नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक वाशी येथील श्री बालाजी हॉल येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत नवी मुंबईतील नागरिकांनी शिवसेनेवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जनतेने शिवसेनेला तब्बल ४२ नगरसेवक निवडून देत दिलेला कौल हा केवळ राजकीय विजय नसून, विकास, प्रामाणिक नेतृत्व आणि जनहिताच्या कामांवरील दृढ विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.
या विजयातून नवी मुंबईकरांनी स्पष्ट संदेश दिला असून, येत्या काळात शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले. जनतेने दाखवलेला हा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एकसंघपणे काम करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ऐतिहासिक विजयामागे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व
या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि लोकाभिमुख नेतृत्वामुळेच शिवसेनेला नवी मुंबईत असा भक्कम जनाधार मिळाल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. पक्षाच्या वतीने शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
याच बैठकीदरम्यान शिंदे साहेबांच्या आदेशानुसार श्री. मनोज हळदणकर यांची शिवसेना गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि महापालिकेतील कामकाज अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेत शिवसेनेचा बुलंद आवाज घुमणार
येणाऱ्या महानगरपालिकेच्या कार्यकाळात शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वत्र घुमला पाहिजे, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ठामपणे मांडले गेले पाहिजेत आणि जनतेच्या हक्कांसाठी एकसंघपणे, निर्धाराने संघर्ष केला पाहिजे, असे मार्गदर्शन नरेश म्हस्के यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना केले.
शहरातील पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यात येणार असून, जनतेशी सातत्याने संवाद ठेवून विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
📍 नवी मुंबईच्या प्रत्येक घडामोडीची माहिती
👉 Navi Mumbai Headlines WhatsApp Channel वर मिळवा.
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vb6cWIaEwEk2MeomVG14
📢 Breaking News साठी Telegram Channel
👉 Navi Mumbai Headlines – Telegram
🔗 https://t.me/navimumbaiheadlines
📘 Facebook Page – Navi Mumbai Headlines
👉 Like • Follow • Share
🔗 https://www.facebook.com/profile.php?id=61585446847151
📰 स्थानिक बातम्या | अपडेट्स | Breaking News
📲 Follow करा आणि अपडेट रहा






